spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री. कुलस्वामिनी आश्रमशाळेत राजीव गांधींची जयंती साजरी

श्री. कुलस्वामिनी आश्रमशाळेत राजीव गांधींची जयंती साजरी

जळकोट, दि.२०(मेघराज किलजे)

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिन जळकोट येथील श्री. कुलस्वामिनी आश्रमशाळेत सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात आला.सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. यात सर्व विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. प्रभात फेरीनंतर प्राचार्य संतोष चव्हाण व प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा पवार यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकमेकाविषयी मनामध्ये संकोच न ठेवता धर्मभेद, जातीभेद, भाषाभेद कसल्याही प्रकारचे भेदभाव न करता सर्व धर्माबद्दल आदर बाळगावा. हाच या दिनाचा उद्देश आहे. एकमेकाविषयी आपुलकी व प्रेम बाळगावे. कोणतेही वाद विवाद सोडवताना एकमेकाशी चर्चा करुन शांततेच्या मार्गाने सोडवावेत. एकमेकांत सुसंवाद ठेवावा. असे सूचीत केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सद्भावना दिवसाची शपथ घेतली.

यावेळी माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव, प्राथमिक आश्रम शाळेचे श्रीमती शांताबाई चौगुले , श्रीमती मिरा पवार, किरण कांबळे , महाविद्यालयाचे प्रा. ज्योतिका चव्हाण , प्रा. सुरेश कोकाटे ,प्रा. अप्पासाहेब साबळे, प्रा. संतोष दुधभाते,प्रा.बालाजी राठोड, प्राध्यापिका प्रमिला कुंचगे , माध्यमिक आश्रम शाळेचे सहशिक्षक देवानंद पांढरे , किरण ढोले ,बिळेणसिध्द हक्के ,कल्पना लवंद , कु. मयुरी कांबळे ,दुर्गेश कदम , श्री. बंकट राठोड , शंकर चव्हाण, अमित खारे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अश्विनी लबडे , श्री. खंडेराव कारले यांनी केले.यावेळी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान ——————————— यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान --------------------------------- यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान --------------------------------- अणदूर,News धाराशिव लक्षवेध   तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील लेखी करारपद्धतीने देव...

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र   News धाराशिव लक्षवेध   तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी राष्ट्रवादी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!