spot_img
spot_img
spot_img
spot_img

नंदिकेश्वर महादेव मंदिर बांधकाम; प्रशांत हत्ते यांचे उदार सहकार्य

नंदिकेश्वर महादेव मंदिर बांधकाम; प्रशांत हत्ते यांचे उदार सहकार्य

जळकोट, दि.२३(मेघराज किलजे)

Jalkयेथून जवळच असलेल्या हंगरगा (नळ) येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले शिवा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा प्रतिक केबल ट्रे प्रा. लि. व प्रतिक स्टॅनलिक प्रा. लि. चे संस्थापक श्री. प्रशांत बसवंतप्पा हत्ते यांनी पुणे फुरसुंगी येथील शिवा स्वयंभू नंदिकेश्वर महादेव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भरीव योगदान दिले आहे.

महादेव मंदिराच्या रेलिंगसाठी तसेच गाभारा गेट व मुख्य प्रवेशद्वार (मेन गेट) साठी लागणारे एस.एस. ३०४ स्टील मटेरियल, एकूण किंमत रु. ३,५०,००० (तीन लाख पन्नास हजार) इतक्या उत्तम दर्जाचे साहित्य मंदिर समितीच्या कार्यकारी मंडळाकडे सुपूर्द केले आहे.
या सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल शिवा संघटना पुणे शहर शाखा व शिवा नंदिकेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने श्री. प्रशांत हत्ते यांचा सत्कार करण्यात आला.
फुरसुंगी (पुणे) येथील तुकाई दर्शन परिसरात सध्या सुरू असलेले शिवा नंदिकेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम हे महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने हाती घेण्यात आले आहे प्रशांत हत्ते यांच्या योगदानामुळे या कार्याला नवी गती मिळाली आहे.

Related Articles

शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न 

शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न News धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावातील विविध विकास कामाचे लोकार्पण व...

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण  — जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण --------------------------------------- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - आमदार राणाजगजितसिंह पाटील News धाराशिव लक्षवेध जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!