spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्रीराम सांस्कृतिक मंडळाच्या श्रीची पत्रकार बांधवांच्या हस्ते पूजा संपन्न

श्रीराम सांस्कृतिक मंडळाच्या श्रीची पत्रकार बांधवांच्या हस्ते पूजा संपन्न

अणदूर (लक्ष्मण नरे)

अणदूर येथील शिक्षक कॉलनी येथील श्रीराम सांस्कृतिक गणेश मंडळाच्या श्री ची पूजा व महाआरती अणदूर शहरातील पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी शहर पत्रकार संघाचे राजकुमार स्वामी, जय मल्हार पत्रकार संघाचे अजय अणदूरकर, शिवाजी कांबळे,शिवशंकर तिरगुळे, लक्ष्मण नरे, प्रा.प्रसन्न कंदले,लिंबाजी सुरवसे गुरुजी या पत्रकार बांधवांच्या हस्ते आरती पार पडली. आरती नंतर सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.जय श्रीराम मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा हा यशस्वी प्रवास यावेळी उलगडून सांगण्यात आला.मंडळाचे सामाजिक कार्य,सर्व सदस्यांचे योगदान या यावेळी सांगण्यात आले.गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रमांची रूपरेषा या ठिकाणी सांगण्यात आली.सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी मंडळाचे मार्गदर्शक यशवंत मोकाशे गुरुजी, प्रा सूर्यकांत आगलावे,रघुराज जाधव गुरुजी,ज्येष्ठ सदस्य कुमार चौगुले,किशोर बायस,शिवराज तलवार,तात्या देडे,माजी सचिव तानाजी पोतदार,अनंत भोसले,अभय घुगे,विवेक हिप्परगे,रत्नाकर रेनके,राहुल अंबुरे,विजयकुमार मार्तंडे,किरण रेणके,अभिजीत बिराजदार,योगेश जाधव,सिकंदर कांबळे,आकाश चौगुले,अमोल कलाकाटे,सचिन रेणके आदीसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश जाधव यांनी तर आभार प्रा. सूर्यकांत आगलावे यांनी मानले.

Related Articles

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान ——————————— यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान --------------------------------- यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान --------------------------------- अणदूर,News धाराशिव लक्षवेध   तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील लेखी करारपद्धतीने देव...

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र   News धाराशिव लक्षवेध   तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी राष्ट्रवादी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!