spot_img
spot_img
spot_img
spot_img

येडोळा येथे आरक्षण आंदोलन विजयी मिरवणूक 

येडोळा येथे आरक्षण आंदोलन विजयी मिरवणूक

जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.४(मेघराज किलजे)

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे मराठा समाजाला आरक्षण आंदोलनात यश प्राप्त झाल्याबद्दल गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
मुंबई आझाद मैदान येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पाठींबा देण्यासाठी येडोळा गावातून युवक गेले होते.यामध्ये रवी पाटील , महादेव पवार , सोनू जाधव , कालिदास जाधव, दत्तात्रय जाधव , गोपाळ जाधव , चेतन जाधव , योगेश जाधव , लक्ष्मण जाधव , राजेंद्र जाधव , नितीन पवार , कन्हैया जाधव , वैजनाथ जाधव , सुर्यकांत जाधव , शशिकांत जाधव हे युवक मुंबईला गेलेली होती. मराठा समाजाला आरक्षण प्राप्त झाल्याबद्दल गावात मारुती मंदिर येथे नारळ फोडून मिरवणूक काढण्यात आली.यात गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी पद्माकर पाटील, सतीश जाधव, राजेंद्र जाधव ,मेजर , धोंडीबा केदार , खंडेराव पाटील , दिलीपसिंग चव्हाण , दत्तात्रय पाटील, नरेश जाधव , अभिषेक पाटील , दशरथ् शित्रे ,महादेव जाधव , सागर जाधव , संकल्प चव्हाण , मारुती पाटील ,आदित्य पाटील , ओंकार पाटील , अमोल जाधव , ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!