पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर.
——————————————-
अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि. २१:
गेल्या अनेक वर्षांपासून पञकार शंकर दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची दखल घेवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” व “इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेच्या वतीने शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी अवॉर्ड्स २०२६” हा पुरस्कार जाहीर झाला असुन ग्रामीण भागातील उत्कृष्ट पञकारीतून केलेल्या कार्याची पावती दुपारगुडे यांना या पुरस्काराच्या रुपाने मिळाली आहे. हा पुरस्कार सोहळा २४ फेब्रुवारी रोजी मुंबईत येथे जगातील १४ पेक्षा अधिक देशातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
या संदर्भात अधिक माहीती देताना ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” आणि “इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” या संस्थेचे सचिव व आयोजक डॉ. संजय भिडे म्हणाले की,
ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” आणि “इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही चेंबर्सचा अनुक्रमे २७ वा व ३२ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६.३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथील रॉयल मुंबई यॉट क्लबच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी अवॉर्ड्स २०२६” प्रदान करून विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यात पञकार शंकर दुपारगुडे यांनी ग्रामीण भागातील जनमाणसांच्या अनेक समस्यां मांडून लक्षवेधी कार्य केले आहे. त्या बद्दल त्यांना द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सोबतच संगित, कला , सामाजिक, महीला सक्षमीकरण, वैद्यकीय, मिडिया, लेखन, उद्योग, पञकारीता, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग कला, संस्कृती, शिक्षण, समाज प्रबोधन, लोककला क्षेञात अतुलनीय कार्य करुन योगदान देणाऱ्या ३३ मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला
मरियानो ऑगस्टिन काउचिनो – अर्जेंटिनाचे राजदूत
न्यायमूर्ती श्रीहरी दावरे हे प्रमुख अतिथी आहेत तर
इव्हान फेटिसोव्ह – कन्सुल जनरल( रशियन) फेडरेशन, पॉल मर्फी – कन्सुल जनरल (ऑस्ट्रेलिया),केमालेत्तिन एरयिगुन – कन्सुल जनरल(तुर्की), ली क्वांग बियेन – कन्सुल जनरल (व्हिएतनाम)
श्री. अलियासान्दार मात्सुकोउ – कन्सुल जनरल, (बेलारूस), गेडिओन लाबाने – कन्सुल जनरल, (दक्षिण आफ्रिका)
सईद मोटलेह – कन्सुल जनरल (इराण)
इकरामुद्दीन कामिल – कार्यवाहक कन्सुल जनरल, (अफगाणिस्तान)फरहाना अहमद चौधरी – उप उच्चायुक्त (बांग्लादेश) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .भारतासह,रशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्की, दक्षिण आफ्रिका, इराण, चिन, व्हिएतनाम, बेलारूस, मेक्सिको, श्रीलंका, अर्जेंटिनासह
१४ पेक्षा अधिक देशांचे राजदूत, वाणिज्य दूत, उच्चायुक्त तसेच उद्योग, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा आंतरराष्ट्रीय व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
विविध देशांतील प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे भारताचे जागतिक स्तरावरील संबंध अधिक दृढ होणार आहेत असेही डॉ. संजय भिडे यांनी सांगितले.





