spot_img
spot_img
spot_img
spot_img

परीवर्तनचे मारुती बनसोडे यांना अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर ; २३ मे रोजी होणार वितरण

परीवर्तनचे मारुती बनसोडे यांना अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर ; २३ मे रोजी होणार वितरण

 

धाराशिव, लक्षवेध प्रतिनिधी

 

परिवर्तन सामाजिक संस्था, नळदुर्गचे संस्थापक सचिव तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे धाराशिव जिल्हा संघटक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त मारुती बनसोडे यांना यावर्षीचा अंबरनाथ टाईम्स कडून दिला जाणारा अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

मारुती बनसोडे हे मूळचे बोरगाव ता. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत गेली ३८ वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत १० वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव ची स्थापना १९९६ मध्ये केली त्या संस्थेकडून गेली ३० वर्षे काम करीत आहेत. पोतराज प्रथा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण, पाणी,ग्रामविकास, विधवा, निराधार,परित्यक्ता, एकल महिलांच्या प्रश्नावर ही ते काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नेहरू युवा पुरस्कार, कल्पना चावला वैज्ञानिक पुरस्कार, कोकण दीप पुरस्कार, भिमरत्न पुरस्कार, भीमपुत्र आयडॉल 2025 पुरस्कार, संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाला आहे, महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. आता अंबरनाथ टाइम्स अंबरनाथ यांच्याकडून अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे हा पुरस्कार 23 मे 2025 रोजी अंबरनाथ येथे एका मोठ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

Related Articles

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना   धाराशिव, लक्षवेध दि. २ जून   शिवा अखिल...

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी – बालाजी घुगे ————————————- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी - बालाजी घुगे ------------------------------------- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा अणदूर, धाराशिव लक्षवेध महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ७१...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!