spot_img
spot_img
spot_img
spot_img

मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत ‘अक्षम्य’ चुका, शिवसैनिकांचा संताप अनावर!

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत अक्षम्य चुका आढळून आल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पददेखिल यात चुकविण्यात आले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष असे पद त्यांच्या नावासमोर लिहिण्यात आले आहे.

कल्याणमधून लोकसभेवर निवडून गेलेले उच्च शिक्षित खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे एस. एस. ऑर्थोपेडिक आहेत. पण त्यांच्या नावासमोर डॉक्टर लिहिण्यात आलेले नाही. विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांचे नाव चक्क पाठक असे लिहिण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली येथील नामवंत आणि अनुभवीत व्यक्तिंना डावलून मर्जीतील लोकांना संमेलनाच्या नियोजन समितीत स्थान देण्यात आल्याने या चुका झाल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. दरम्यान, आयोजकांनी लगेच या चुका सुधाराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

उपोषणाचे गांभिर्य नाही का? नळदुर्ग शहरातील अतिक्रमण काढन्यात यावे या करीता शहरातील तरुण नगरपालिके समोर आज सकाळ पासुन उपोषणास बसले आहेत. परंतु हा विषय नगरपालिकेने...

साप्ताहिक ‘धाराशिव लक्षवेध’च्या शुभारंभ अंकाचे थाटात प्रकाशन!

साप्ताहिक 'धाराशिव लक्षवेध'च्या शुभारंभ अंकाचे थाटात प्रकाशन! अशोकभाऊ जगदाळे यांच्या हस्ते प्रकाशन; नळदुर्गातील मान्यवरांची उपस्थिती, शुभेच्छांचा वर्षाव नळदुर्ग (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!