spot_img
spot_img
spot_img
spot_img

ऋजूता बिराजदार शिक्षणासाठी स्टॉकहोमला रवाना

ऋजूता बिराजदार शिक्षणासाठी स्टॉकहोमला रवाना

जळकोट , दि.१६(मेघराज किलजे)

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सेवानिवृत्त मुख्य अभियंता मल्लिनाथ बिराजदार यांची नात रुजूता बिराजदार ही उच्च शिक्षणासाठी स्वातंत्र्यदिनी स्टॉकहोमला झाली आहे.
रुजुता बिराजदार हिने २०२४ मध्ये मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. मास्टर्ससाठी तयारी करत असताना तिने युजर एक्सपीरियन्स डिझायनर म्हणून नोकरी स्वीकारली. पुढील शिक्षणासाठी तिला केटीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्विडनमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिने इंटर ॲक्टिव्ह मीडिया टेक्नॉलॉजी हा कोर्स निवडला आहे. इंजिनिअरिंग ज्ञानासोबत डिझाईनची आवडही जपणारा आणि वापरकर्त्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास मदत करणारा एक परफेक्ट कोर्स रुजूताला करता येणार आहे. सध्या बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी स्वयंसेवी कार्यामध्ये ती सहभागी आहे. रूजूताने सोलापूर विद्यापीठाकडे आतापर्यंतचे प्रोजेक्ट्स एकत्र करून एक डिझाईन पोर्टफोलिओही तयार केला. तिने आयईएलटीएस परीक्षाही दिली आणि तिला सीआरईएफ स्केलवर सी १ हा दर्जा मिळाला आहे.

Related Articles

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना   धाराशिव, लक्षवेध दि. २ जून   शिवा अखिल...

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी – बालाजी घुगे ————————————- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी - बालाजी घुगे ------------------------------------- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा अणदूर, धाराशिव लक्षवेध महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ७१...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!