spot_img
spot_img
spot_img
spot_img

हंगरगा(नळ) तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संजय वाघोले

हंगरगा(नळ) तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संजय वाघोले

जळकोट, दि.२९(मेघराज किलजे)

जळकोट येथून जवळच असलेल्या हंगरगा (नळ) गावच्या महात्मा गांधी गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी संजय शिवशंकर वाघोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.हंगरगा (नळ)येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे नूतनीकरण करण्यात आले. महात्मा गांधी गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून हंगरगा (नळ) गावातील ज्येष्ठ समाजसेवक, कै. शिवशंकर वाघोले यांचे चिरंजीव श्री. संजय वाघोले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेचे अध्यक्ष व सरपंच श्री. अतुल कलशेट्टी यांनी त्यांचे नाव सुचवताच हंगरगा (नळ) गावचे उपसरपंच श्री. मोहन चव्हाण यांनी अनुमोदन दिले. या निवडीनंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी अनिल पाटील, राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोहर घोडके, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. रायकेलकर , तलाठी श्री. दयानंद जोगदंड , कृषी अधिकारी गौतम कांबळे , श्री. प्रवीण चौगुले, श्री. संदीप वाघोले, श्री. अमोल वाघोले, श्री. अविनाश पाटील, श्री. विशाल पाटील, शरपोद्दीन पटेल, अंबादास घोडके ,सिद्धेश्वर वाघोले, बंडाप्पा आपशेट्टी, तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, गावातील नागरिक यांनी सत्कार केला. या निवडीनंतर संजय वाघोले यांचा एकनाथी मंदिरात सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांत हत्ते व मित्रपरिवारातर्फे यथोचित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!