spot_img
spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग मध्ये बदलाचे वारे ; धरणे आप्पा आघाडीवर ————————————– युवकांसह महिला,नागरिकांमध्ये “आप्पा” ला पसंती

नळदुर्ग मध्ये बदलाचे वारे ; धरणे आप्पा आघाडीवर
————————————–
युवकांसह महिला,नागरिकांमध्ये “आप्पा” ला पसंती

नळदुर्ग News धाराशिव लक्षवेध

शेवटच्या टप्प्यात कॉर्नर सभा,गाठीभेटी व डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा असलेले भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज आप्पा धरणे प्रचारात एक नंबर वरती आहेत.मतदान यंत्रावरती क्रमांक 3 ला असले तरी प्रचारात मात्र एक नंबर वरती मजल मारली असल्याने विजयी घोडदौड सुरू असल्याचे बोलले जात आहे.

धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात करीत नळदुर्ग शहरात त्यांनी जोरदार झंजावात निर्माण केला आहे.या प्रचाराचा झंझावातात युवक,महिला व नागरिकांचा आप्पा धरणे यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे.भारतीय जनता पार्टीने “बदल हवा तर चेहरा नवा” व “विकास हवा तर आप्पा हवा”…या घोष वाक्याने नळदुर्ग शहर आप्पा माय झाले आहे. आपला मी सामान्य आहे,समाजसेवक आहे,तुमच्या मधीलच एक आहे असे म्हणत बसवराज आप्पा धरणे लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

सामान्य जीवनशैली,स्वच्छ प्रतिमा व मोठा जनसंपर्क, जनमानसामध्ये राहणारा युवक ही धरणे आप्पा यांची जमेची बाजू आहे. आप्पा धरणे यांचा जनसंपर्क मोठा असल्यामुळे त्यांना प्रचारामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे व नागरिक स्वतः आप्पा सोबत फिरताना दिसून येत आहेत.

सर्वांचे सुखदुःखात सहभागी होणारा युवक म्हणून बसवराज अप्पा धरणे यांच्याकडे पाहिले जाते.आप्पा हे सध्या प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसून येत आहेत.युवकांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाल्यामुळे बसवराज आप्पा याचे सध्या तरी जड आहे.
त्यासोबतच त्यांनी नगरपरिषदेच्या विविध भागांमध्ये जाऊन आपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे.यामध्ये त्यांच्यासोबत विविध वार्डातील उमेदवार ही आहेत.त्यामुळे थंडीच्या कडाक्यात आप्पांनी प्रचाराचा धडा काढल्याने वातावरण तापले आहे.सध्या तरी बसवराज आप्पा धरणे आघाडीवर असल्याचे चित्र नळदुर्ग शहरात दिसून येत आहे.

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!