spot_img
spot_img
spot_img
spot_img

आज जगद्गुरूंचा अड्डपालखी सोहळा ; अणदूर ( मल्हार नगरी) स्वागतासाठी सज्ज

आज जगद्गुरूंचा अड्डपालखी सोहळा ; अणदूर ( मल्हार नगरी) स्वागतासाठी सज्ज

अणदूर (लक्ष्मण नरे)

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी पट्टा अभिषेक रौप्य महोत्सवानिमित्त भव्य अड्डपालखी महोत्सव मंगळवारी दि.१९ रोजी दुपारी ४ वाजता श्री नीलकंठेश्वर मठ ते कै.सि.ना आलुरे गुरुजी महोत्सव स्थळी
सोबत सवाद्य सुहासिनींचे कुंभ मिरवणूक यामध्ये श्री श्री श्री १००८ जगद्गुरु वीरसिंहासनाधीश्वर प्रसन्न रेणुक वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी,श्रीमद रंभापुरी महापीठ
श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सद्गुरु सिंहासनाधीश्वर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी, श्रीमद उज्जैनी महापीठ
श्री श्री श्री १००८ जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
श्रीमद काशीमहापीठ
श्री श्री श्री १००८ जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीमद काशी महापीठ या यांचा अड्डपालखी महोत्सव गावातील मुख्य मार्गावरून होणार आहे. सर्व भाव भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जय्यत तयारी –
जगद्गुरु च्या स्वागतासाठी मल्हार नगरी सजली असून ठीक ठिकाणी कमानी ,भगवे पताके, ध्वज यासह स्वागताचे फलक लावून तयारी करण्यात आली असून रस्त्याच्या मधोमध पायघड्यावर रांगोळी त्यासोबतच संवाद्य कुंभ व अड्डपालखी मिरवणूक असल्याने समितीच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे.

शिवकथा सांगता —
आज सायंकाळी ७ वाजता शिवकतेची सांगता होणार आहे यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!