spot_img
spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी – बालाजी घुगे ————————————- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी – बालाजी घुगे
————————————-
अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा
अणदूर, धाराशिव लक्षवेध
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ७१ वा वर्धापन दिनानिमित्त अणदूर बसस्थानकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी घुगे यांच्या हस्ते वाहतूक नियंत्रक कार्यालयाचे पूजन करून व एस टी बसचे पूजन करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना घुगे म्हणाले की, सुरक्षित सेवा व विश्वासाचे परंपरा जोपासण्याचे काम एसटी महामंडळाने गेली ७१ वर्ष जोपासले आहे. एसटीच्या सेवेमुळे सर्वसामान्य माणसाचे नाळ दळणवळण परिस्थिती जोडले असून आजच्या दिवशी एसटी महामंडळ प्रत्येक बसस्थानक आणि आगारांमध्ये कार्यक्रमाला आहे. अणदूर बस स्थानकात हा वर्धापन दिन प्रवाशांच्या साक्षीने साजरा करताना आनंद होत असल्याचे भावना बालाजी घुगे यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी उमरगा आगाराचे वाहतूक नियंत्रक अतुल बारभाई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्याणी मुळे ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, पत्रकार राजकुमार स्वामी, पत्रकार लक्ष्मण नरे, वाहतूक नियंत्रक चव्हाण, सुरेश तोडकरी, मल्लिनाथ लंगडे,संजय करपे, भिमराव गायकवाड,बाबा तांबोळी,अतुल घोंगडे,खंडू व्हानाळे,अमोल महाबोले रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!