spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड

शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

 

धाराशिव, लक्षवेध दि. २ जून

 

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर घोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, लोहरा व उमरगा तालुक्यातील जुन्या कार्यकारिण्या बरखास्त करून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

लोहा (जि. नांदेड) येथील संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री. संजय बताले (नळदुर्ग) यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच श्री.सतीश पाटील (हिप्परगा ता. तुळजापूर) यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, श्री. रविराज (गोटू) मुळे यांची तुळजापूर तालुका अध्यक्षपदी तर श्री. प्रशांत बोधणे (सावरगावकर) यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजातील युवकांना संघटित करून धाराशिव जिल्ह्यातील शहर, तालुका व गावपातळीवरील संघटनात्मक काम अधिक जोमाने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच मठ-मंदिर, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाशी संबंधित उपक्रमांद्वारे समाजहिताची कामे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे (पुणे), राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता भाऊ चव्हाण (उदगीर), राज्य सरचिटणीस धनकुमार शिवणकर (परभणी) यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वीरशैव लिंगायत समाजाची मोठी संख्या असलेल्या धाराशिव जिल्ह्यात समाज संघटित करून विविध प्रश्न सोडविण्यासाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरांतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे ...

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!