spot_img
spot_img
spot_img
spot_img

वंचित बहुजन आघाडी धाराशिव पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूर येथे आयोजित अविनाश वशिकर जिल्हा निरीक्षक उपस्थित राहणार

  • वंचित बहुजन आघाडी धाराशिव पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूर येथे आयोजित अविनाश वशिकर जिल्हा निरीक्षक उपस्थित राहणार

तुळजापूर दि.14 चंद्रकांत हगलगुंडे

वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी तुळजापूर येथे आयोजित केली असून विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड यांचा 59 वा वाढदिवस आहे.
संभाव्य नगरपंचायत,नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वपूर्ण असून या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर,जिल्हा प्रभारी ॲड.रमेश गायकवाड,मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल,युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे,फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वय प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,धाराशिव जिल्हा जिल्हाध्यक्ष ॲड.प्रणित डिकले हे सर्व उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा कार्यकारिणी,महिला आघाडी,युवक आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन,माथाडी जनरल कामगार युनियन,फुले आंबेडकर विद्वत सभा या सर्व शाखांमधील शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष त्याचबरोबर आजी-माजी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.या बैठकीसाठी जिल्हा उपाध्यक्ष आर.एस.गायकवाड, जिल्हा संघटक परमेश्वर लोखंडे, तुळजापुर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न 

शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न News धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावातील विविध विकास कामाचे लोकार्पण व...

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण  — जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण --------------------------------------- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - आमदार राणाजगजितसिंह पाटील News धाराशिव लक्षवेध जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!