spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

 

मुरूम,प्रतिनिधी दि.३० ऑगस्ट

 

मुरूम येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची आयोजित १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ३०) रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ३१ मार्च २०२५ च्या ताळेबंद, नफातोटा व विविध विषयावर सविस्तर चर्चा करताना यंदाच्या आर्थिक वर्षात या पतसंस्थेस २९ लाख ९३ हजार ८२८ रुपयाचा निव्वळ नफा झाला असून या पतसंस्थेकडे यंदा १३ कोटी ४० लाख ७२ हजार ९४९ रुपयाच्या ठेवी, संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात १ कोटी ५३ लाख १६ हजार ४४५ रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक ४ कोटी ८५ लाख १३ हजार १२७ रुपये असून या संस्थेचे ३७२० सभासद आहेत. संस्थेच्या स्थापनेपासूनच ऑडीट वर्ग ‘अ ‘ दर्जा प्राप्त असून संपूर्ण संगणकीकृत, मानाचा विभागीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे अध्यक्षीय समारोप प्रसंगी त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते भीमराव वरनाळे, चंद्रशेखर मुदकण्णा, शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, जगन्नाथ पाटील, व्यंकटराव पाटील, तानाजी फुकटे, चेतन पाटील, सायबणप्पा हिरमुखे, प्राचार्य दत्तात्रय इंगळे, चेतन पाटील, किसन खंडागळे, देवानंद बिराजदार, प्रशांत मुदकण्णा, भागवत सोनवणे, शंकर पाटील, भगत माळी, खय्युम चाकूरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सभेतील विषय पत्रिकेचे वाचन शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे यांनी करून बहुमताने सर्व ठरावास एकमताने सहमती घेतली. किसन खंडागळे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, संचालक संगीता अशोक जाधव, वंदना सोनवणे, मनिष मुदकण्णा, श्रीशैल बिराजदार, बाबासाहेब पाटील, इंद्रजित लोखंडे, कॅशिअर चिदानंद स्वामी, राजेंद्र मुदकण्णा, प्रशांत काशेट्टे, सचिन कंटेकूरे, नेहा रावळकर, संतोष मुदकण्णा, महातंय्या स्वामी, गुंडेराव गुरव आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय इंगळे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन संचालक मनोज बोंदर तर आभार अमृत वरनाळे यांनी मानले. यावेळी पंचक्रोशीतून बहुसंख्येने सभासद, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवरांसह पदाधिकारी व अन्य.

Related Articles

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान ——————————— यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान --------------------------------- यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान --------------------------------- अणदूर,News धाराशिव लक्षवेध   तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील लेखी करारपद्धतीने देव...

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र   News धाराशिव लक्षवेध   तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी राष्ट्रवादी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!