spot_img
spot_img
spot_img
spot_img

धोंडीबा बिराजदार कडून महादेव मंदिराला एक लाख आठ हजार रुपयांची देणगी

धोंडीबा बिराजदार कडून महादेव मंदिराला एक लाख आठ हजार रुपयांची देणगी

जळकोट, दि.२२(मेघराज किलजे)

जळकोट येथून जवळच असलेल्या हंगरगा (नळ)येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष धोंडीबा बिराजदार यांनी महादेव मंदिराच्या मंदिर बांधकामासाठी १ लाख८००० रुपयाची देणगी दिली आहे.
महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने फुरसुंगी (पुणे) येथील तूकाई दर्शन येथे शिवा नंदिकेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात येत आहे. धोंडीबा बिराजदार यांनी कै. भारतबाई बिराजदार यांच्या स्मरणार्थ एक लाख आठ हजार रु. देणगीचा धनादेश महादेव मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केले. यावेळी उद्योजक प्रदीप हत्ते, ट्रस्टचे खजिनदार रोहिदास बेलुरे, किसन खडके, प्रशांत बिराजदार, सिद्राम पाटील, हांडे व बिराजदार कुटुंबीय उपस्थित होते.

Related Articles

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना   धाराशिव, लक्षवेध दि. २ जून   शिवा अखिल...

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी – बालाजी घुगे ————————————- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी - बालाजी घुगे ------------------------------------- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा अणदूर, धाराशिव लक्षवेध महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ७१...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!