देशमुख वाड्यातिल ऐतिहासिक ठेवा जोपासन्यासाठी आज सुरुवात करन्यात आली आसुन सर्व हिंदुच्या सहकार्यातुन नृसिंह हणुमान मंदिराचा जिर्णोद्धार करन्यात येणार असल्यामुळे सर्व तरुणांना विनंती कि या कार्यात पुढे यावे.
आज शुक्रवार दि ३/७/२०२६ रोजी देशमुख वाड्यातिल गवळीगल्ली येथिल मुख्य प्रवेशद्वारा कडील बाजुने बंद असलेला रस्ता व आत पडलेला मलबा काढन्याच्या कामाचा शुभारंभ करन्यात आला. या कर्याकरीता नगरपालिके मार्फत जे सी बी मागवुन कार्याला सुरुवात करन्यात आली. जेसीबीचे पुजन नगरसेवक आकाश कुलकर्णी, सुधीर पोतदार, सकल हिंदु जनजागृती चे गणेश मोर्डे, विजय ठाकुर, प्रमोद कुलकर्णी, एकनाथ शिंदे सेनेचे शहर प्रमुख शिवाजी उर्फ नडु सुरवसे, प्रदिप ग्रामोपाध्ये, नंदु पोतदार यांच्या हस्ते पुजन करन्यात आले. त्या नंतर प्रदिप ग्रामोपाध्ये यांच्या घराच्या बाजुने भिंत पाडून जेसीबी ने रस्ता तयार करुन आत पडलेला दगड मातीचा मलबा झाडी वेली काढुन प्रथम मार्ग केला गेला आहे. या कार्याकरीता नगरसेवक आकाश कुलकर्णी यांनी नगरपालिकेकडे जेसीबी व कामगार पाठवन्यास सांगीतले व त्यास नगराध्यक्ष यांनी प्रतिसाद देवुन सहकार्य केले.
देशमुख वाडा हा ऐतिहासिक वाडा आहे येथिल नृसिंह मंदिर हे जागृत आहे. निरा नरसिंहपुर ता. इंदापुर जि पुणे येथिल नृसिंह देवतेची सध्या तिथे असलेली मुर्ती पुर्वी कित्येक वर्षे देशमुख वाड्यात स्थापिली होती. त्याच देवतेचे हे पविञ ठिकान आपल्या शहराथ आहे हे आपल्या सर्व हिंदुचे सौभाग्य आहे. जसे प्रभुश्रीराम, श्रीखंडोबा चरण या भुमिस लाभले तसेच चरण श्रीनृसिंह देवतेचे चरण लागले आहेत याकरीत या पविञ जागेवर नृसिंह व हणुमान मंदिराचा जिर्णोध्दार आपल्या सर्वांच्या हातुन घडावा अशी अपेक्षा आहे.







