spot_img
spot_img
spot_img
spot_img

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टाकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे चिञ निर्माण झाले आहे.


धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खंदे समर्थक निष्ठावान शिवसैनिक समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे सेनेमध्ये नुकताच प्रवेश केला असून यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.
यापूर्वी ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे शिवसेनेचे म्हणून निवडून आले होते. त्यांच्या गटाचे धाराशिव लोकसभा मतदार संघातील जिल्ह्यामध्येचार विधानसभा मतदार संघ आहेत त्या मध्ये धाराशिव कळंब मतदारसंघात आमदार कैलास पाटील व उमरगा लोहारा मतदारसंघात आमदार प्रविण स्वामी हे निवडून आले आहेत. बार्शि मतदार संघातुन आमदार दिलीप सोपल हे ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचेच आहेत, एका भुम परंडा मतदार संघावर एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे वर्चस्व आहे येथुन आमदार तानाजी सावंत हे निवडुन आले आहेत तर भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण पाटील हे करमाळा विधानसभा मतदारसंघातुन विजयी झाले आहेत. पक्षीय बलाबल पाहता सन २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर हे ३, २९, ८८४ मताच्या विक्रमी मतानी निवडुन आले त्यांना ७, ४८, ७५२ मते मिळाली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना ४, १८, ९०६ मते मिळाली. या वरुन धाराशिव लोकसभा मतदार संघावर महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहीलेले आपणास पहावयास मिळते.
परंतु लोकसभा निवडणुकी नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकी मुळे पुन्हा राजकिय गणिते बदलली.
देवेंद्र फडणविस यांच्या मंञीमंडळात वर्चस्व असतानाही एकनाथ शिंदे सेनेचे आमदार तानाजी सावंत यांना अद्याप स्थान मिळवता आले नाही. तर भाजपाने जिल्ह्यातील राजकारणाची सुञे तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे सोपवली असल्याने. अनेक राजकिय नेत्यांची राजकिय कोंडी केली जात आहे.
जिल्हापरीषद पंचायत समिती निवडणुकीत भुम परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप करताना सर्वपक्षात राणा पाटील हे सेटलमेंटचे राजकारण करतात. असे म्हटले होते.
यामुळे त्यांनी जिल्हातिल सर्व मात्तबर नेत्यांना ऐकीचा मंञही दिला होता माञ तो यशस्वी झाला नाही.
माञ गेल्या महिन्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाच्या विकासाचा व विकास निधीचा विशय करीत ठाकरे सेनेला रामराम करीत शिंदेसेनेत प्रवेश केला यामुळे जिल्हाचे राजकारण बदलु लागले आहे. जे नेते भाजपाच्या वाटेला धावु लागले होते ते आता शिंदेसेने कडे आकर्षित होत आहेत. जिल्हात उमरगा, धाराशिव व भुम परंडा मतदार संघावर शिंदेसेनेचे वर्चस्व आहे. राहता राहीला तुळजापूर मतदार संघाचा प्रश्न तर येथे सर्वजण मिळुन राणाजगजितसिंग पाटील यांच्यापुढे तगडे आव्हान उभे करन्याची तयारी राजकिय वर्तुळात चालु आहे असेराणाजगजितसिंग पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार गटातील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात सामावुन घेतले आहे. तर जिल्ह्यात आता उ. बा. ठा कमजोर झाली आहे. विधानसभा निवडणुकी पर्यंत यापक्षात किती जण टिकुन राहतात हे सांगता येत नाही. तर भारतिय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात ही चलबिचल चालुच आहे. पक्षाला उभारी देईल असे जिल्हा काँग्रेस चे मजबुत संघटन करन्याची पक्ष तयारी करीत आहे परंतु साम दाम दंड भेद निती व जिल्हातील सर्वाना सांभाळून पुढे घेऊन जाईल असा चेहरा तुळजापूर तालुक्यातील अशोक जगदाळे व्यतिरिक्त कोठे दिसत नाही. तर राणाजगजितसिंग पाटील यांनी आधीच काँग्रेस पक्षात त्यांचे हितचिंतक पेरुन ठेवल्यामुळे ते अशोक जगदाळे यांच्या सारख्या प्रामाणिक नेत्याचेच पाय ओढन्याचे इनामे इतबारे करताना दिसतात. जर काँग्रेस ने जगदाळे यांच्याकडे जिल्हाची सर्वसुञे सोपवली व आतापासुनच विधानसभा व लोकसभेची मोर्चे बांधणी करन्यास सुरुवात केली तर महाविकास आघाडीची ताकद ही वाढु शकते हे काँग्रेस च्या नेतृत्वाने लक्षात घेतले पाहीजे.
धाराशिव जिल्हा हा नेहमिच महाविकास आघाडी साठी पाँझिटीव राहीला आहे. हे विसरता येत नाही. थोडक्यात सांगायचे तर जिल्हयातिल राजकारण कात टाकीत आहे ऐवढेच.

Related Articles

धाराशिवच्या अनुदानित अध्यापक विद्यालयावर ₹25 लाख अतिरिक्त फी वसुलीचे गंभीर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार

धाराशिव येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित अनुदानित अध्यापक विद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करून सुमारे ₹25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर...

देशमुख वाड्यातिल ऐतिहासिक ठेवा जोपासन्यासाठी आज शुभारंभ करण्यात आला.

देशमुख वाड्यातिल ऐतिहासिक ठेवा जोपासन्यासाठी आज सुरुवात करन्यात आली आसुन सर्व हिंदुच्या सहकार्यातुन नृसिंह हणुमान मंदिराचा जिर्णोद्धार करन्यात येणार असल्यामुळे सर्व तरुणांना विनंती कि...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!