spot_img
spot_img
spot_img
spot_img

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

तुळजापुर दि.18 चंद्रकांत हगलगुंडे

वंचित बहुजन आघाडी जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूर येथे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १६ रोजी संपन्न झाली .संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी वंचित बहुजन आघाडी पक्षाची धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी पक्षाची ताकद संपूर्ण आढावा याप्रसंगी घेण्यात आला .

शनिवारी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संभाव्य नगरपंचायत,नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यापक स्वरूपात बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर,जिल्हा प्रभारी ॲड.रमेश गायकवाड,युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे,जिल्हाध्यक्ष ॲड.प्रणित डिकले,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के उपस्थित होते.
याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचा निर्धार करण्यात आला जिल्ह्यातील वंचित शोषित पीडित समाज घटकांच्या न्याय हक्क अधिकारांसाठी लढणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी सातत्याने निवेदने आंदोलने पक्षाच्या माध्यमातून करून पक्ष कायम सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहतो सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढवणार असा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष आर एस गायकवाड यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरा करण्यात आला.

यावेळी धाराशिव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळजापूर तालुक्यातील सर्व टिम परिश्रम घेतले, तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे, जिल्हा संघटक परमेश्वर लोखंडे माजी पीएसआय गौतम गायकवाड, ज्ञानदेव बनसोडे,जिवन कदम, मिलिंद रोकडे, सुरेश मस्के, विलास दुपारगुडे, आकाश गायकवाड,यल्लाप्पा दुपारगुडे,रसुल शेख, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष
नासिर शेख,रविकिरण बनसोडे,रुस्तमखा पठाण,जिल्हा संघटक विकास बनसोडे,प्रवक्ता ॲड. के.टी.गायकवाड,शिवाजी कांबळे,उमेश कांबळे,अमोल शेळके,वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल युनियन जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे,माजी जिल्हाध्यक्ष बि.डी.शिंदे,रामभाऊ गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे उमाजी गायकवाड,समता सैनिक दला च्या आम्रपाली बसवराज गोतसुर्वे,पंकज सोनकांबळे,नितीन सीतापुरे सहदेव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.सोलापुर जिल्हा माजी अध्यक्ष श्रीशैल गायकवाड साहेब यांनी आर एस गायकवाड यांचा वाढदिवस साजरा केला त्यांच्या सोबत भाई राजे सोनकांबळे आणि जेष्ठ विचारवंत लेखक साहित्यिक आदरणीय बाबु आण्णा बनसोडे उपस्थित होते. शनिवारी सातत्याने पाऊस चालू असताना देखील बैठकीसाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनंजय सोनटक्के यांनी केले आयोजन व निमत्रंक आर एस गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष, परमेश्वर लोखंडे जिल्हा संघटक अंकुश लोखंडे तुळजापूर तालुका अध्यक्ष हे होते. सूत्रसंचालन गोविंद भंडारे यांनी तर आभार प्रदर्शन जीवन कदम यांनी केले.

Related Articles

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान ——————————— यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान --------------------------------- यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान --------------------------------- अणदूर,News धाराशिव लक्षवेध   तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील लेखी करारपद्धतीने देव...

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र   News धाराशिव लक्षवेध   तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी राष्ट्रवादी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!