बोरगावमध्ये भदंत सोमानंद यांचा धम्मदेशना कार्यक्रम संपन्न
जळकोट,१८(मेघराज किलजे)
तुळजापूर तालूक्यातील मौजे बोरगाव (तुपाचे) येथे बुध्दिष्ठ इंटरनॅशनल नेटवर्क भिक्कू संघ, नवी दिल्लीचे राष्ट्रीय प्रभारी भदंत सोमानंद यांच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या समवेत भिक्कू संघाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी भंते शासन मेता (भिकूनी),भंते विश्वमित्रा ( भिकूनी)उपस्थित होते.
बोरगाव येथे बौद्ध धम्म प्रचार व प्रसार अभियान नळदुर्ग सर्कल -२०२५ अंतर्गत वर्षावासनिमित्त बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भिकू संघाचे राष्ट्रीय प्रभारी सोमानंद यांच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने भिकू संघाचे गावात आगमन होताच फटाक्याची अतिषबाजी करत पुष्पांची बरसात करुन स्वागत करण्यात आले.या प्रसंगी बोलताना भदंत सोपानंद म्हणाले की, भविष्यातील धोके टाळण्यासाठी तथागत भगवान बुध्दांचा स्वयंम प्रकाशित व्हा… हा संदेश आत्मसात करून बौध्दानी शिक्षणाकडे लक्ष देवून देव, धर्म कर्मकांडासह विविध कार्यक्रमावर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर खर्च करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षित सुसंस्कारक्षम पिढी घडवण्याचा प्रयत्न करावा.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुतन सरपंच कविता कांबळे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के गायकवाड हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन लक्ष्मण कांबळे यांनी केले.यावेळी उपसरपंच लक्ष्मण पाटील, सहशिक्षक मोहन माने, पोलीस पाटील नागेश कलशेट्टी,सोसायटी चेअरमन बसवंतराव मुळे, दत्तात्रय साळूंके, माजी सरपंच शेखर कलशेट्टी, मधुकर सुतार, अण्णाराव फुलारी,मुख्याध्यापक राम बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल जाधव, अशोक कांबळे, शैलेंद्र सोनकांबळे,गौतम कांबळे, अनिल बनसोडे, अप्पाराव सोनकांबळे, सुधीर गायकवाड, आशिष जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला, ग्रामस्थ,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.