जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब मुरूम सिटीचा उपक्रम
धाराशिव लक्षवेध. (मुरूम बातमीदार)
रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय मुरूम येथील सर्व रुग्णांना फोटोग्राफर यांच्या वतीने व रोटरी क्लब मुरूम सिटीच्या सहकार्याने फळांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामीण रुग्णालयातील डॉ. गंगासागरे यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी सर उपस्थित होते.
या प्रसंगी शहरातील प्रमुख छायाचित्रकार उपस्थित होते , “फोटोग्राफर म्हणजे क्षणांना कायमस्वरूपी स्मरणात ठेवणारा कलाकार आहे; समाजातील घडामोडींचे जतन करण्याचे मोठे कार्य त्यांच्या माध्यमातून घडते.” असे प्रतिपादन रोटे डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले . यानंतर शहरातील फोटोग्राफर गोपाळ इंगोले, दिलीप जाधव, काशिनाथ बिराजदार, खाशीम कोतवाल, वैभव शिंदे, पंडित पीचे, सिद्धेश्वर पीचे, स्वप्नील पांचाळ, प्रशांत ढवळे, सुनील दीक्षित, निसार शेख, संकेत इंगोले, संदीप बाबळसुरे यांचा रोटरी क्लबच्या वतीने शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रोटे. संतोष कांबळे, रोटे. सुनील राठोड, रोटे.राजाराम वाकडे, रोटे.कल्लाय्या स्वामी, रोटे डॉ. सुधीर पंचगल्ले आदिनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोटे. संतोष कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोटे.सुनील राठोड यांनी मानले.