बसवेश्वर हायस्कूलचे माजी विद्यार्थी ५१ वर्षांनी एकत्र
जळकोट , दि.२०(मेघराज किलजे)
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री बसवेश्वर हायस्कूलचे माजी विद्यार्थी ५१ वर्षानी एकत्रित येवून माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात साजरा केला. या मेळाव्यासाठी शंभरपेक्षा अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. अनेकांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.
श्री. बसवेश्वर हायस्कूल, जेवळी येथील १९७४ च्या दहावीच्या बँचच्यावतीने माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक भुसणे तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय सभापती इराप्पा डिग्गे, सेवानिवृत्त शिक्षक मुरलीगिरी गोसावी, एस.आर.कोरे, डी.आर. लामजणे, अण्णाराव शिंदे, बसवणप्पा कोरे,रेवणसिद्ध हावळे, विजयाबाई चनशेट्टी,बाबुराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बँचचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश विद्यार्थी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.मुंबई येथील सेवानिवृत्त प्राचार्य जगन्नाथ बावा,माजी सैनिक काशिनाथ चिनगुंडे, राम मुदगले यांनी पुढाकार घेऊन हा योग जुळवून आणला.या कार्यक्रमाप्रसंगी सर्व माजी विद्यार्थी ५१ वर्षानी भेटत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. चेहरापट्टी चक्क बदलली असल्याने अनेकजण अंदाजाने ओळखत होते आणि ओळख पटल्यानंतर दिलखुलास गप्पा मारताना दिसत होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य एम.वाय.भोसले, मुख्याध्यापक पी.सी.बनसोडे, दयानंद भुजबळ, यांच्यासह या बँचचे शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.जगन्नाथ बावा यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामगिर गिरी, रमेश घोरपडे, प्रकाश पाटील, सिद्धप्पा मुरमे, अशोक शिंगाडे, विष्णू कांबळे, मल्लिनाथ कोरे, दौलप्पा तोरकडे, सूरेश कोरे, संभाजी कारभारी,त्रिशला कोठे,शिवकांता होनाजे यांनी परिश्रम घेतले.
भावनांना वाट मोकळी करून दिली
एक्कावन वर्षानी भेटण्याचा योग जुळून आला या दरम्यान अनेकांच्या जीवनात आनंदी आणि कटू प्रसंग आले होते. एकमेकांना अलिंगन देत अनेकांनी आपल्या डोळ्यातील अश्रूना वाट मोकळी करून दिली. अनेकांच्या जीवनात आनंदाची बाग फुलली तर काहीच्या जीवनात हालअपेष्टा असल्याचे दिसून आले.
मोबाईलची सवय काही जाईना
या बँचच्या सर्वच विद्यार्थ्यांनी तीन मिनीटात आपले मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम सुरू होता. आपल्या जीवनात कधीही माईकवरती बोलण्याचा योग न आलेल्या फणेपूर येथील या बँचचे विद्यार्थी खबुला मुल्ला यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर गेल्यानंतर माईक समोर धरण्याऐवजी कानाला लावला त्यामुळे हास्यकल्लोळ झाला. मोबाईल सवय लागण्याचा परिणाम दिसून आला.
यशस्वी बँच
या बँचची वैशिष्ट्ये म्हणजे चौथी शिष्यवृत्ती परिक्षेत जेवळी शाळेतून शिवकांता आवटे हि पहिली शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तर स्वांतत्र्यपूर्व काळातील शिक्षण संस्था असलेल्या जेवळी शाळेला या बँचला दहावीचे सेंटर मिळाले आणि या बँचमधून डाँक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक, वकील, शिक्षक, आरोग्य विभाग, पोलीस,वीज महामंडळ अशा विविध पदावर शासकीय सेवेत असणाऱ्याची संख्या जास्त प्रमाणात होती.
गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी १२०१२ रूपये
श्री बसवेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, जेवळी येथील परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनी