spot_img
spot_img
spot_img
spot_img

रोटरीचे आप्पासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

रोटरीचे आप्पासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

मुरूम, ता. उमरगा, दि .२१ (प्रतिनिधी)

येथील रोटरी क्लब मुरूम सिटीचे सदस्य तथा उद्योजक रोटरीयन आप्पासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरूम येथील जिल्हा परिषद प्रशालेतील गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप गुरुवारी (दि.२१) रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, कंटेकुरचे सरपंच गोविंद पाटील, प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. सुधीर पंचगले, वस्तीगृह अधीक्षक महेंद्र कांबळे आदित्य प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, अशा उपक्रमशीलतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला गती मिळून उज्वल पिढी निर्माण होऊ शकते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी देशमाने म्हणाले की, अशा कृतिशील बांधिलकीमुळे आम्हा सर्वांना याचा सार्थ अभिमान वाटतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते. साहित्य वाटपाच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील संतोष कडगंचे, हरिभाऊ माकणे, मोहन राठोड, क्रांती कांबळे, संगीता घुले, राजू पवार, नागनाथ कामशेट्टी, बाळासाहेब कांबळे, निर्मला परीट आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर तर आभार शिवाजी कवाळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आप्पासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्य वाटप करताना मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनी.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!