तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुलस्वामिनी हॉलीबॉलमध्ये प्रथम
जळकोट, दि.२३(मेघराज किलजे)
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जळकोट येथील श्री कुलस्वामिनी आश्रम शाळेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉलीबॉल संघाने बाजी मारल्याने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. मुलाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
विजेत्या संघाला क्रिडा शिक्षक श्री. बिळेणसिद्ध हक्के,बाळासाहेब मुखम यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण , प्राचार्य संतोष चव्हाण , क्रीडा अधिकारी गणेश पवार , क्रीडा संयोजक राजेश बिलकुले, मुख्याध्यापिका श्रीमती आशा पवार, श्री. कुलस्वामिनी माध्यमिकचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव, श्री. कुलस्वामिनी प्राथमिकचे ज्येष्ठ शिक्षक खंडेराव कारले, प्रा. अश्विनी लबडे , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.