तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विपुल पिसे याचे यश
जळकोट, दि.२६(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेचा इयत्ता नववीचा विपुल पिसे या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन अणदूर येथील श्री श्री गुरुकुल रविशंकर विद्यामंदिर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील विविध शाळेतील १७८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये १७ वर्षीय वयोगटातील मुले व मुली यांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये विपुल विजय पिसे याने घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक संतोष सारणे , समाधान पवार , जयराम शिंदे , पुष्पलता कांबळे , बनपट्टे, सुरवसे , कदम यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल पालक वर्गातून कौतुक केले जात आहे.