श्री कुलस्वामिनी आश्रमशाळेत भटके विमुक्त दिन साजरा
जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.३१(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व राजर्षी शाहू कला,
विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संतोष चव्हाण हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून अलियाबादचे सरपंच सूर्यकांत चव्हाण, नागेंद्र गुरव , खंडेराव कारले उपस्थित होते. प्रथम श्री संत सेवालाल महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बंजारा, धनगर समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून बंजारा नृत्य ,गीत सादर केले. कु. राठोड अक्षरा इ.९ वीची विद्यार्थीनी बंजारा भाषेत आपली संस्कृती परंपरा कशी होती. आता कसे आहे . यावर चांगल्या पद्धतीने भाषण केले.
संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रिटिशांच्या राज्यकाळात १८७१ मध्ये क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट या काळ्याकुट्ट कायद्याने अनेक भटक्या व पारंपरिक जमातींना जन्मजात गुन्हेगार ठरवले. समाजातील या घटकांना गुन्हेगारीची ओळख देण्यात आली. २९५३ मध्ये स्वातंत्र्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला. या जमातींना विमुक्त असे संबोधले गेले. तरीही समाजाने त्यांच्या माथ्यावर बसवलेली गुन्हेगार ही ओळख पुसली गेली नाही. आजही अनेक ठिकाणी त्यांना शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात तितक्याच अडचणींना सामोरे जावे लागते.
यावेळी प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका पवार आशा, श्रीमती शांताबाई चौगुले , महाविद्यालयाचे प्रा. अप्पासाहेब साबळे , प्रा. संतोष दुधभाते ,प्रा. बालाजी राठोड, प्रा. प्रमिला कुंचगे,प्रा. अश्विनी लबडे माध्यमिक आश्रम शाळेचे सहशिक्षक बिळेणसिध्द हक्के , किरण ढोले ,,बाळासाहेब मुखम ,कल्पना लवंद , कु. मयुरी कांबळे , ,दुर्गेश कदम , बंकट राठोड , अमित खारे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कांबळे यांनी तर आभार देवानंद पांढरे यांनी मानले.