प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार
मुरुम, धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी
तालुक्यातील जवळगा बेट येथील सुपुत्र आणि लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांना भारतीय दलित पँथरच्या वतीने नुकताच “राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.डॉ. गायकवाड हे नामवंत समाजशास्त्रज्ञ, संवेदनशील विचारवंत, अभ्यासू लेखक आणि सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध विद्यापीठे, संस्था आणि संघटनांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, त्यांच्या व्याख्यान व लेखनातून समाजप्रबोधनाचा प्रभावी मार्ग उभा राहिला आहे.
उपेक्षित, वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी ते गेली अनेक दशके सातत्याने कार्यरत आहेत.सामाजिक बांधिलकी, विचारांची सत्त्वता आणि प्रेरणादायी संघर्षमय जीवनप्रवास यांचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे कार्य होय.त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत, हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.