दस्तापुर तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राम चव्हाण
जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.४(मेघराज किलजे)
जळकोट येथून जवळच असलेल्या दस्तापुर (ता. लोहारा) येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राम माणिक चव्हाण यांची एक मताने निवड करण्यात आली.सरपंच मनीषाताई सुरेंद्र काळाप्पा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीसाठी चर्चा करण्यात आली. यात राम चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच सोमनाथ वसंतराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र डावरे, ग्रामसेवक गोविंद पाटील, प्रगतशील शेतकरी नागेश कलशेट्टी,लोहारा तालुका भाजपा सरचिटणीस जयेश सूर्यवंशी, शालेय समिती अध्यक्ष सुरज डावरे आदि पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.