spot_img
spot_img
spot_img
spot_img

येडोळा येथे आरक्षण आंदोलन विजयी मिरवणूक 

येडोळा येथे आरक्षण आंदोलन विजयी मिरवणूक

जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.४(मेघराज किलजे)

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे मराठा समाजाला आरक्षण आंदोलनात यश प्राप्त झाल्याबद्दल गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
मुंबई आझाद मैदान येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पाठींबा देण्यासाठी येडोळा गावातून युवक गेले होते.यामध्ये रवी पाटील , महादेव पवार , सोनू जाधव , कालिदास जाधव, दत्तात्रय जाधव , गोपाळ जाधव , चेतन जाधव , योगेश जाधव , लक्ष्मण जाधव , राजेंद्र जाधव , नितीन पवार , कन्हैया जाधव , वैजनाथ जाधव , सुर्यकांत जाधव , शशिकांत जाधव हे युवक मुंबईला गेलेली होती. मराठा समाजाला आरक्षण प्राप्त झाल्याबद्दल गावात मारुती मंदिर येथे नारळ फोडून मिरवणूक काढण्यात आली.यात गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी पद्माकर पाटील, सतीश जाधव, राजेंद्र जाधव ,मेजर , धोंडीबा केदार , खंडेराव पाटील , दिलीपसिंग चव्हाण , दत्तात्रय पाटील, नरेश जाधव , अभिषेक पाटील , दशरथ् शित्रे ,महादेव जाधव , सागर जाधव , संकल्प चव्हाण , मारुती पाटील ,आदित्य पाटील , ओंकार पाटील , अमोल जाधव , ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न 

शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न News धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावातील विविध विकास कामाचे लोकार्पण व...

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण  — जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण --------------------------------------- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - आमदार राणाजगजितसिंह पाटील News धाराशिव लक्षवेध जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!