तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत अणदूरच्या जवाहरचा संघ प्रथम
अणदूर ( लक्ष्मण नरे)
क्रीडा युवा कल्याण संचालनालय व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा (दि.१२ व १३) अणदूर येथील जवाहर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या.या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचा सहभाग होता.वय १७ वर्ष मुलींचा खो-खो संघ प्रथम,वय १७ वर्ष मुलांचा संघ प्रथम व वय १४ वर्ष मुलांचा संघ प्रथम असा डोळ्याचे पारणे फिटतील असा खेळ करून तालुक्यातून अव्वल ठरले आणि जिल्हास्तरीय खो-खो सामन्यासाठी निवड झाली.
शाळेतील खो-खो खेळाडूंना क्रीडाशिक्षक जयहिंद पवार,राजेश गीते,ठाकरू राठोड,युवा प्रशिक्षणार्थी दादाराव घोडके,प्रणीलकुमार बनसोडे ,अंकुश मोकाशे यांचे मार्गदर्शन लाभले.मार्गदर्शक क्रीडा शिक्षक व सर्व खेळाडूंचे संस्थेचे सचिव तथा सरपंच रामचंद्र आलुरे,जेष्ठ विधीज्ञ लक्ष्मीकांत पाटील, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.