महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक मिळवलेल्या डॉ अक्षय काळे यांचा शहापूर ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार
अणदूर, धाराशिव लक्षवेध
तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथील अक्षय काळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून आठवा क्रमांक घेऊन यश संपादन केल्याबद्दल डॉ अक्षय दिलीप काळे व त्यांच्या मातोश्री महानंदाताई दिलीप काळे यांचा शहापूर ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी (दि.४) नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच धन्यकुमार जाधव तर प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून नळदृग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन यादव,डॉ संतोष पवार,नेताजी जाधव, सेवानिवृत्ती केंद्रप्रमुख दगडू सालेगावे, ज्येष्ठ नागरिक भास्कर बापू सुरवसे,अशोक मोरे, प्रदीप जोशी, सरपंच उमेश गोरे, माजी सरपंच पांडुरंग सुरवसे,माजी उपसरपंच प्रदीप काळे, नितीन काळे, बाबू जाधव, नरसोपंत काळे गुरुजी, पोलीस पाटील बालाजी खरात,शहाजी सोमवंशी,शाहूराज जाधव, पांडुरंग मोरे,जितेंद्र पाटील, मुकुंद शिंदे,बाबा जाधव, नितीन जाधव, जि प के प्रा शाळा मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी, छत्रपती शिवाजी विद्यालय मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपसरपंच नानासाहेब पाटील तर आभार माजी सरपंच विजयकुमार पवार यांनी मानले.





