भाजपचे आप्पा धरणे यांची प्रचारात आघाडी ; युथ आयकॉन आप्पांचा सोशल मीडिया वरही धूम धडाका
नळदुर्ग News धाराशिव लक्षवेध
भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज आप्पा धरणे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.तर दुसरीकडे युथ आयकॉन म्हणून सोशल मीडियावरती सध्या आप्पा चर्चेत आहेत.
वार्ड क्रमांक चार मधून विल देवी देवतांना वंदन करून व श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करीत नळदुर्ग शहरात त्यांनी जोरदार झंजावात निर्माण केला आहे. आप्पा धरणे यांच्यासोबत मोठा युवक वर्ग असल्यामुळे युवकांचा “आयकॉन” म्हणून यांच्याकडे पाहिले जात आहे.भारतीय जनता पार्टीने “बदल हवा तर चेहरा नवा” या माध्यमातून समाजसेवक बसवराज आप्पा धरणे यांना निवडणुकी मध्ये उतरवले आहे.स्वच्छ प्रतिमा व मोठा जनसंपर्क ही धरणे आप्पाची जमेची बाजू आहे. आप्पा धरणे यांचा जनसंपर्क मोठा असल्यामुळे त्यांना प्रचारामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सर्वांचे सुखदुःखात सहभागी होणारा युवक म्हणून बसवराज अप्पा धरणे यांच्याकडे पाहिले जाते.आप्पा हे सध्या प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसून येत आहेत.युवकांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाल्यामुळे बसवराज आप्पा याचे सध्या तरी जड आहे.त्यासोबतच त्यांनी नगरपरिषदेच्या विविध भागांमध्ये जाऊन आपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे.यामध्ये त्यांच्यासोबत विविध वार्डातील उमेदवार ही आहेत.त्यामुळे थंडीच्या कडाक्यात आप्पांनी प्रचाराचा धडा काढल्याने वातावरण तापले आहे.सध्या तरी बसवराज आप्पा धरणे आघाडीवर असल्याचे चित्र नळदुर्ग शहरात दिसून येत आहे.





