महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा नवनीत च्या वतीने सन्मान
धाराशिव लक्षवेध जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२५- २६ चा क्रांतीज्योती सावित्रीबाई राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल नवनीत प्रकाशनच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील तीनही आदर्श शिक्षकांचा सन्मान चिन्ह,सन्मान पत्र देउन करण्यात आला.यामध्ये डॉ.प्रविण किसनराव बनकर,प्रा.अशोक चंद्रकांत खडके, श्रीमती.जयमाला शिरीष वटणे यांचा नवनीत प्रकाशनच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनीत प्रकाशन धाराशिव जिल्हा प्रतिनिधी बालाजी आडसुळ व सुशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.
यावेळी बोलताना सुशांत पाटील म्हणाले की,शालेय उपक्रमाविषयी,परिसराविषयी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी आपण चांगले कार्य केले आहे.त्यामुळे आपणास या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.नवनीत प्रकाशन पुढील काळात गुणवत्ता वाढीसाठी,विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी लागणारी सर्व पुस्तके माफक दरामध्ये देण्याचे आश्वासन यांनी यावेळी बोलताना दिले.







