अणदूर: संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ सुयश मोकाशे यांचा सत्कार
——————————————
धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने डिग्गी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुयश मोकाशे यांचा कर्नाटक राज्यामध्ये एम एस अर्थोपेडिक सर्जन या शाखेला प्रवेश मिळाल्याने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सुर्यकांत आगलावे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मल्लीनाथ बिराजदार, पोलीस पाटील जावेद शेख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत मोकाशे, खंडोबा पणनचे व्यवस्थापक दिगंबर मोळगडे, उद्योजक माणिक निर्मळे, पत्रकार सचिन तोग्गी,शिक्षिका सुरेखा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी डॉ सुयश मोकाशे यांचा मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार दयानंद काळुंके यांनी केले, सुत्रसंचलन डॉ प्रसन्न कंदले यांनी तर आभार माजी सरपंच प्रबोध कांबळे यांनी मानले.यासाठी डॉ अभिनंदन काळुंके, डॉ अभिलाषा काळुंके,संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या संचालिका अनिता काळुंके,ग्रा पं सदस्या अनुसया कांबळे,प्रणित कांबळे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता





