spot_img
spot_img
spot_img
spot_img

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अणदूर मुख्य रस्त्याचा लोकार्पण सोहळा ; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे ॲड दीपक आलुरे यांचे आवाहन 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अणदूर मुख्य रस्त्याचा लोकार्पण सोहळा ; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे ॲड दीपक आलुरे यांचे आवाहन

 

News धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी

 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे तीर्थ विकास प्रादेशिक पर्यटन विभागाच्या वतीने श्री तीर्थक्षेत्र खंडोबा मंदिर ते बसस्थानक दरम्यान बनवण्यात आलेल्या मुख्य रस्त्याचे लोकार्पण तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तर माजी मंत्री बसवराज पाटील,माजी आमदार सुजितसिंह ठाकुर,भाजपा नेते सुनिल चव्हाण,भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी,भाजपा माजी अध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲड दीपक आलूरे यांनी रविवारी (दि.२८) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष दीपक घोडके,माजी सरपंच धनराज मुळे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दयानंद मुडके,भाजपा जिल्हा परिषद गटप्रमुख प्रवीण घोडके, पंचायत समिती गण प्रमुख लक्ष्मण बोंगरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यटन विकासच्या माध्यमातून आमदार राणा पाटील यांनी अणदूर गावातील या मुख्य रस्त्यासाठी १ कोटी ९९ लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. जीएसटी वगळता १ कोटी ६६ लाख रुपयाचे काम रस्ता व ३६ पारंपारिक पद्धतीचे पथदिवे,एक हाय मोस्ट टावर व विद्युतीकरण करण्यात आले आहे.पुढे बोलताना आलुरे म्हणाले की, तीर्थक्षेत्राच्या धरतीवर या ठिकाणी बसवण्यात आलेले पारंपरिक विद्युत खांब व मुख्य रस्ता यामुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे.आमदार पाटील यांच्या माध्यमातून गावामध्ये विविध विकास करणे करण्यात आले असल्याचे सांगून पुढील काळात भरघोस निधी घेऊन वत्सलानगर परिसरातील मुख्य रस्ता व सर्व शासकीय कार्यालये एकत्रित असणारे प्रशासकीय भवन, हुतात्मा स्मारक सुशोभीकरण व महिलांसाठी दोन ओपन जिम उभारणार असल्याची माहिती यावेळी दिली. गुरुवार दि.१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी ॲड आलुरे यांनी केले.

Related Articles

बामूचा अर्थसंकल्प : केवळ आकड्यांचा खेळ नको, तर हवा विकासाचा ‘मॅनिफेस्टो’! –  डॉ. सतिश गावित

बामूचा अर्थसंकल्प : केवळ आकड्यांचा खेळ नको, तर हवा विकासाचा 'मॅनिफेस्टो'! -  डॉ. सतिश डी. गावित   धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि.२२   (लेखक हे सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब...

पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर. ——————————————- अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर...

पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर. ------------------------------------------- अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल     धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!