spot_img
spot_img
spot_img
spot_img

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण  — जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
—————————————
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार राणाजगजितसिंह पाटील
News धाराशिव लक्षवेध
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण केंद्र सरकार व राज्य सरकार ची सर्वतोपदी मदत घेत असून यात शेतीला शाश्वत पाणी,ग्रामीण विकास रस्ते प्राथमिक सुविधा,औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढ व युवकांसाठी रोजगार निर्मिती  यासह तुळजापूर , नळदुर्ग व अणदूर तीर्थक्षेत्रांतर्गत विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बोलताना सांगितले.
अणदूर येथील दोन कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या मुख्य रस्त्याचा व दुतर्फा लावण्यात आलेल्या पथदिवे व अण्णा चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि.६) रोजी करण्यात आले.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी सभापती संतोष बोबडे,ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे,नळदुर्ग नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के,माजी सभापती सचिन पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे, निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे,माजी सरपंच धनराज मुळे,शहराध्यक्ष दीपक घोडके,राज पाटील यासह विविध गावातील सरपंच,विविध आघाडीचे प्रमुख,गटप्रमुख,गटप्रमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
अण्णा चौक ते बस स्थानक दरम्यान तीर्थक्षेत्र विकासांतर्गत मुख्य रस्ता पथदिवे व सुशोभीकरण कामामुळे अणदूरच्या वैभवात भर पडली असून तीर्थक्षेत्र श्रीखंडेरायाचे हे तीर्थक्षेत्र मोठे तीर्थक्षेत्र बनवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार यांनी तर आभार माजी सभापती ॲड दीपक आलूरे यांनी मांडले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दयानंद मुडके,प्रवीण घोडके,निलेश आलुरे,लक्ष्मण बोंगरगे यांच्यासह पदाधिकारी आणि परिश्रम घेतले.
चौकट –
पत्रकारांचा सन्मान –
भारतीय जनता पार्टी शाखा अणदूर यांच्या वतीने गावातील व बाहेरगावातील ३० पत्रकारांचा सन्मान दर्पण दिनाचे औचित्य साधून आमदार पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ , पेन देऊन करण्यात आला.

Related Articles

बामूचा अर्थसंकल्प : केवळ आकड्यांचा खेळ नको, तर हवा विकासाचा ‘मॅनिफेस्टो’! –  डॉ. सतिश गावित

बामूचा अर्थसंकल्प : केवळ आकड्यांचा खेळ नको, तर हवा विकासाचा 'मॅनिफेस्टो'! -  डॉ. सतिश डी. गावित   धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि.२२   (लेखक हे सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब...

पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर. ——————————————- अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर...

पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर. ------------------------------------------- अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल     धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!