spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री श्री गुरुकुलचे योगासने व बुद्धिबळ स्पर्धेत यश

श्री श्री गुरुकुल चे जिल्हास्तरीय बुद्धिबळ व योगासन स्पर्धेत घवघवीत यश

अणदूर,प्रतिनिधी दि.१३ ऑगस्ट

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ व योगासने स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.जी एच रायसोनी मेमोरियल धाराशिव यांच्या वतीने एकदिवसीय खुल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते.यात १५६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.यामध्ये श्री श्री गुरुकुल मधील अर्णव जितेंद्र कानडे याने खुल्या गटातून द्वितीय क्रमांक मिळवून रोख दोन हजार रुपये व ट्रॉफी असे बक्षीस मिळवले आहे तर १९ वर्षे वयोगटात ध्रुवराज धनराज मुळे याने ९ वा क्रमांक मिळवून मेडल मिळवले.

जिल्हा योगासन असोसिएशन धाराशिव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय योगासने स्पर्धा धाराशिव जिल्हा क्रीडा संकुल धाराशिव येथील हॉल मध्ये पार पडल्या.यामध्ये योगासनातील विविध क्रीडा प्रकारात फातिमा शेख व समृद्धी माळी यांनी सुवर्ण पदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे,सचिव डॉ नागनाथ कुंभार,संचालिका डॉ रूपाली कानडे,मुख्याध्यापक लक्ष्मण नरे,शिवराज भुजबळ, रामेश्वर सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड

शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बताले तर तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रवी (गोटू) मुळे यांची निवड शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना   धाराशिव, लक्षवेध दि. २ जून   शिवा अखिल...

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी – बालाजी घुगे ————————————- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा

महाराष्ट्राची सर्वसामान्यांची जननी म्हणजे लालपरी - बालाजी घुगे ------------------------------------- अणदूर बसस्थानक येथे एस टी चा ७१ वा वर्धापनदिन साजरा अणदूर, धाराशिव लक्षवेध महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ७१...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!