श्री संत सेना महाराज उत्सव समिती शहापूरच्या अध्यक्षपदी सुमेश सोमवसे तर उपाध्यक्षपदी कृष्णा सोमवसे यांची अविरोध निवड
अणदूर प्रतिनिधी दि.13 ऑगस्ट
तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे श्री संत शिरोमणी संत सेना नाभिक समाज मंडळाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत कार्यकारीनीची अविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी सुमेश सोमवसे, उपाध्यक्ष शांतकुमार सोमवसे, कोषाध्यक्षपदी कृष्णा सोमवशे, सचिव चंद्रसेन सोमवसे, सल्लागार ज्ञानदेव सोमवसे, व पांडू टेलर यांचे एकमताने निवड करण्यात आली. तर सदस्यपदी सर्वश्री.. प्रशांत सोमवसे, लक्ष्मण सोम वसे, तात्याराव सोमवसे, दिगंबर सोमवसे, महादेव सोमवसे, आकाश सोमवसे, गणेश सोमव से, दत्तात्रय सोमवसे, संतोष सोमवसे, धनाजी सोमवसे, नितीन सोमवसे, अंगद सोम वसे यांची निवड करण्यात आली.
19 ऑगस्ट रोजी स्थापना, रात्रभर जागरण भजन कीर्तन, 20 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी महाप्रसाद आयोजित केला असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नूतन अध्यक्ष सोमवसे यांनी केले आहे.