spot_img
spot_img
spot_img
spot_img

बेरडवाडी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव उत्साहात साजरा

बेरडवाडी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव उत्साहात साजरा

सा.धाराशिव लक्षवेध (मुरूम बातमीदार) दि.१५

बेरडवाडी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणजीतकुमार भोकले, उपसरपंच दशरथ मंडले, तसेच शिवशंकर मंडले, काशिनाथ वासुदेव, कनय्या भोकले, पूजा मंडले, ज्योती भोसले, अनिता मंडले, सदस्य भाग्यश्री वासुदेव, सपना मंडले, हणमंत भोकले, खंडेराव मंडले ,चंद्राम मंडले, राम मंडले, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय ध्वजवंदनाने झाली. शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित असताना विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, भाषणं व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून शिक्षणाबरोबरच चारित्र्य, शिस्त आणि देशप्रेम जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल राठोड यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन बालाजी भालेराव यांनी मान्यवरांचे आभार मानून केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल मडमे, सहशिक्षक सुनिल राठोड, बालाजी भालेराव, युवराज चव्हाण, रंजना तांदळे, युवा प्रशिक्षक जमादार राधिका यांनी विशेष परिश्रम घेतले.संपूर्ण कार्यक्रमामुळे शाळा परिसर देशभक्तीच्या जयघोषाने आणि तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघाला. देशभक्तीचा उत्साह विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांच्या मनात भरून राहिला.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!