जगन्नाथ पाटील यांच्या वतीने श्री महादेव वाचनालयास पाच हजार रुपये देणगी ; वाचनालयाच्या वतीने पाटील यांचा सत्कार
सा .धाराशिव लक्षवेध (अणदूर )
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील महादेव गल्ली येथील एम.जी ग्रुप मार्फत श्री महादेव सार्वजनिक वाचनालय गेल्या तीन वर्षांपासून सर्वांच्या सहकार्यातून व्यवस्थीत चालु आहे. या आधुनिक तंत्रज्ञान युगात वाचनाची आवड लुप्त पावत असुन नव युवकांना व बाल मनावरील संस्कार घडवायचे असेल तर वाचन संस्कृती जपली पाहिजे. अन्नाचा दुष्काळ पडला तर माणुस मरतो, पंरतु जर चांगल्या विचारांचा दुष्काळ पडला तर माणुस जगातून नाहीशी होईल. त्यामुळे जर माणुसकी टिकवायचे असेल वाचन संस्कृती टिकविणे त्यातुन चांगल्या विचाराची या समाजात पेरणी करणे काळाची गरज आहे.
वाचना विषयी आवड असलेले अनेक व्यक्तिमत्व समाजात अजुन आहेत.त्यातील एक जगन्नाथ बाबासाहेब पाटील यांनी श्री महादेव सार्वजनिक वाचनालयास अंदाजे ५००० रूपयाचे पुस्तके भेट देवुन सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभार अशा वाचन प्रेमी व्यक्ति समाजदर्शक म्हणून काम करतात त्यांना असे काम करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी आज दि.१५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त महादेव गल्लीतील ध्वजारोहण दरम्यान श्री.महादेव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अच्युत शिवाजी आलुरे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आले .त्यावेळी उपस्थित सर्व संचालक व एम.जी ग्रुप सदस्य उपस्थित होते.





