लोहारा भाजप सरचिटणीसपदी जयेश सुर्यवंशी
जळकोट, दि.१४(मेघराज किलजे)
भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका सरचिटणीसपदी दस्तापुर येथील भाजपाचे कार्यकर्ते जयेश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.भाजपा नेते सुजितसिंह ठाकुर , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी व लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहारा भारतीय जनता पार्टीच्या जयेश सूर्यवंशी यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
जयेश सुर्यवंशी यांनी निवड झाल्यानंतर
नवीन जबाबदारी ही नवीन प्रेरणा देणारी आहे. या पदावर नक्कीच चांगले काम प्रयत्न करत राहीन. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, विविध सामाजिक माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.