सिंदगाव जि प शाळेत गोकुळाष्टमी साजरी
जळकोट, दि.१६(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेतील बाल गोपाळांनी गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम केला.
दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन पालक धनाजी पाटील, प्रदीप बनजगोळे, शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख अनिलकुमार करदुरे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी राधा कृष्ण व गोपिका यांची वेशभूषा परिधान केले होते. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर लवटे, धोंडाप्पा परशेट्टी , मेघराज बिराजदार, राघवेंद्र बिराजदार, महम्मदहुसेन शेख, इब्राहिम जमादार, अण्णाप्पा करंडे,बसवराज कुलकर्णी, दत्ता शिंदे, सतीश क्षीरसागर आदी ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका अंजली बटगिरी, अनिता मुनाळे,सुजाता मोरे, सुवर्णा नळगिरी, गटलेवार जी.बी., भंडारवाड एच बी, सागर पाटील,अजय शिंदे, बसवराज सुतार, चंद्रकांत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.