spot_img
spot_img
spot_img
spot_img

लोहगाव खंडाळा प्रकल्प भरले ; आ. पाटील यांच्या हस्ते जलपूजन

लोहगाव खंडाळा प्रकल्प भरले ; आ. पाटील यांच्या हस्ते जलपूजन

जळकोट , दि.२८(मेघराज किलजे)

येथून जवळच असलेल्या लोहगाव(ता.तुळजापूर) येथील लघु पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेले खंडाळा प्रकल्प पूर्ण क्षमतेने तुडूंब भरला आहे .सांडव्यातून पाणी वाहत आहे. या प्रकल्पातून पाणी वाहत असल्याने तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

लोहगाव व परिसरात झालेल्या पावसाने खंडाळा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, शेतकरी आनंदीत झाला आहे. प्रकल्पाचे जलपूजन करून आ.पाटील यांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी लोहगावचे सरपंच श्री. प्रवीण पाटील,उपसरपंच प्रशांत देशमुख, माजी पंचायत समितीचे सभापती रेणुका इंगोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिध्देश्वर कोरे, भाजपा नळदुर्ग मंडळ अध्यक्षा रंजना राठोड,भाजपा जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, विजय शिंगाडे, विलास राठोड,अंगद जाधव, विवेकानंद मेलगिरी, सचिन घोडके,दामाजी राठोड, दिलीप सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ दबडे, विनायक काटकर,माजी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, सतिश काटे, महेबुब शेख,सुनिल बनसोडे,मारुती बनसोडे,पंकज पाटील,अदिती कुलकर्णी,अंगद इंगोले, सोसायटी चेअरमन राहुल मारेकर,शिवानंद कलशेट्टी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राहुल शेंडगे., वीरप्पा मिरगे, सुरेश चव्हाण, विजय पाटील
यांच्यासह परिसरातील व गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(फोटो: रेशमा फोटो, लोहगाव)

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!