वागदरीतून मराठा आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार
जळकोट , दि.१९( मेघराज किलजे)
मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथे आयोजित मराठा आरक्षण आंदोलनास वागदरी (ता.तुळजापूर) येथील शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
वागदरी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक व्यंकट पाटील यांच्या उपस्थितीत येथील महादेव मंदीराच्या सभागृहात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांच्या नेत्रत्वाखाली मुंबई येथील अझाद मैदानावर दि.२९ रोजी आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी पूर्व तयारी करण्याकरिता बैठक घेण्यात आली. वागदरी येथून कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगितले.