अणदूर व परिसरात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा ; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले पूजन
अणदूर; संपादक – लक्ष्मण नरे
भारतीय हिंदू संस्कृती मध्ये मुक्या जनावरांचा मोठा सण बैल पोळा. अणदूर व परिसरात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांनी शुक्रवारी (दि.२२) रोजी साधेपणाने व मोठ्या भक्ती भावाने साजरा केला.मुक्या जनावरांना आपला अन्नदाता मानणारा बळीराजा वर्षातून एक दिवस त्यांचे पूजन करतो,त्यांना गोडधोड खायला घालतो तो सण म्हणजेच बैलपोळा.श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पिठोरी अमावस्येला हा सण दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.
आदल्या दिवशी बैलांना आंघोळ घालून स्वछ करुण त्याला गूळ पाणी (गुळवणी) पाजले जाते.पोळ्याच्या दिवसी त्यांची रंग रंगोटी करून पूजा करतात व पुरण पोळीचा नैवद्य दाखविला जातो.श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते व त्या सणांचा शेवट हा बैलपोळा असतो वर्षभर राब राब राबणाऱ्या या जनावरांना एक दिवस त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न बळी राजा पोळ्यादिवसी करीत असतो.पोळा जरी निमित्त असलं तरी या प्राण्यांचा आदर,सन्मान आणि आदर्श ठेवण्याचा दिवस असतो.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या अणदूर येथील शेतात परिवार सह बैलांचे पूजन केले. यावेळी तुळजाभवानी शेतकरी सह साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव चव्हाण,युवा नेते अभिजित चव्हाण,रणवीर चव्हाण यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.