विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी अरबाज शेख याची निवड
जळकोट, दि.२३(मेघराज किलजे)
तुळजापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जळकोट येथील इंदिरा काळे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अरबाज बडेसाब शेख याने यश मिळवले आहे. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, जळकोटवाडी (नळ) चे अध्यक्ष शिवाजीराव काळे,प्राचार्य श्री. गाहिनीनाथ काळे ,जिल्हा क्रीडा संयोजक इसाक पटेल , महाविद्यालयाचे प्रा. मिनाज शेख , प्रा.रोमन , प्रा. मोटे , प्रा.राठोड , प्रा.गायकवाड , प्रा.मोरे , प्रा.वाघमारे , प्रा.नकाते , प्रा.सूर्यवंशी, लक्ष्मण देडे, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.