spot_img
spot_img
spot_img
spot_img

विश्वबंधुत्व दिनानिमित्त २०० साधकांचे रक्तदान

विश्वबंधुत्व दिनानिमित्त २०० साधकांचे रक्तदान

जळकोट , दि.२५(मेघराज किलजे) दि.२५ ऑगस्ट

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र, आनंदनगर येथे राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात २०० साधकांनी रक्तदान करून विश्वबंधुत्व दिन उत्साहात साजरा केला.

प्रथम दादीजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी डॉ.धनंजय चाकूरकर (सिव्हिल सर्जन, धाराशिव शासकीय रुग्णालय), डॉ. दिग्विजय दापके (सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, धाराशिव),डॉ. कुलदीप मिटकरी तसेच ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, प्रियंका दीदी (येडशी सेवा केंद्र प्रभारी), वैजनाथ भाईजी (येरमाळा सेवा केंद्र प्रभारी) आदींच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत रक्तदान करा व इतरांना नवजीवन द्या. अशी प्रेरणा साधकांना दिली.
सिव्हिल सर्जन धनंजय चाकूरकर यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यात असे उपक्रम सिव्हिल हॉस्पिटलमध्येही राबविण्याची सूचना केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी ब्रह्माकुमारींच्या सेवाभावाची स्तुती केली.
तर सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिग्विजय दापके यांनी मानवतेसाठी या सेवा अद्भुत आहेत, सध्या मन:शांतीची गरज आहे. असे आवाहन केले.

या शिबिरात २०० हून अधिक साधक उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. अनेक रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. रक्तदात्यांना केंद्राच्या प्रभारी ज्योती दीदी व कृष्णा दीदी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनीही सहभागी होऊन रक्तदान शिबिराला प्रोत्साहन दिले.
या रक्तदान शिबिराद्वारे ब्रह्माकुमारी संस्थेने पुन्हा एकदा मानवतेची सेवा व विश्वबंधुत्वाची भावना समाजापर्यंत पोहोचवली आहे.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!