गणेशोत्सवाची तयारी जोरात ; गणेशाच्या आगमनासाठी लोहगावकर सज्ज
जळकोट, दि.२५(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे गणेश आगमनाची उत्सुकता गणेश भक्तांना लागली आहे. गावातील विविध मंडळे गणेशोत्सवाची जोरात तयारी करत आहेत.
दि.२७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोहगाव गावातील विविध गणेश मंडळ जोरात तयारी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.रंग बेरंगी हार, विद्युत उपकरणे, सजावटीच्या साहित्याने बाजार पेठाही फुलल्या आहेत.
आपल्या गणरायाचे आगमन होणार म्हणून सर्वच मंडळे सज्ज व तयारीला लागले आहेत.लहान थोर गणेश मंडळामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार म्हणून आनंदाचे वातावरण आहे. गणेश मूर्तिकार मूर्ती बनवण्यामध्ये मग्न आहेत.