पर्यावरण जनसेवा पुरस्काराने नागनाथ कुठार सन्मानित
जळकोट, दि.२६(मेघराज किलजे)
पोलीस दलात सतत व्यस्त असणाऱ्या कर्तव्याच्या कामातून वेळ काढून पर्यावरणासाठी काम करणारे तुळजापूर तालुक्यातील किलज गावचे मूळ रहिवासी व उरण (मुंबई) येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कर्तव्य बजावत असलेले श्री. नागनाथ कुठार यांना सन – २०२५ सालासाठीचा वशेनी इतिहास संपादकीय मंडळाचा पर्यावरण जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
नागनाथ कुठार यांनी पर्यावरण क्षेत्रात आत्तापर्यंत मोठे काम उभे केले आहे. ज्या- ज्या ठिकाणी वृक्ष लागवडीची गरज आहे. त्या -त्या ठिकाणी स्वखर्चातून वृक्ष लागवडी केल्या आहेत. किलज या त्यांच्या मूळ गावी ही त्यांनी वृक्ष लागवड करून ग्रामीण भागात पर्यावरण चळवळीला चालना दिली आहे. कुठार एका खास कार्यक्रमात वशेनी इतिहास संपादकीय मंडळाचा पर्यावरण जनसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस दल व सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.