सलगरा गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी गंगाराम मोरे ,शत्रुघ्न चव्हाण उपाध्यक्ष
जळकोट, दि.३०(मेघराज किलजे)
जळकोट येथून जवळच असलेल्या सलगरा (म.) येथील गावच्या महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती
अध्यक्षपदी गंगाराम पांडुरंग मोरे तर उपाध्यक्षपदी शत्रुघ्न सर्जेराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीवेळी सरपंच सुनिता आप्पाराव चव्हाण,ग्रा, पं.सदस्य मनोज सोमवंशी, मिनाक्षी वाघमारे, राजेंद्र ईटकर माजी जि.प.सदस्य दिलीप सोमवंशी,माजी उपसंरपच जनार्दन चव्हाण,माजी.तंटामुक्त उपाध्यक्ष बालाजी उत्तरेश्वर सराटे,शामबाबा सुरवसे,संजय थिट्टे, गजेंद्र जगदाळे, गणपती जावळे, प्रविण ईटकर, कार्तिक रोट्टे,सुचित चव्हाण, नितीन कोकाटे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला